चिखलीकरच्या लॉकरमध्ये सापडलं साडे नऊ किलो सोनं

May 9, 2013 10:29 AM0 commentsViews: 35

09 मे

अहमनदनगर : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर इंजिनिअर सतीश चिखलीखर याच्या पत्नीच्या लॉकरमध्ये तब्बल साडेनऊ किलो सोनं सापडलं आहे. चिखलीकरची पत्नी स्वाती चिखलीकरचं अहमदनगर जिल्ह्यातल्या बँकेतलं लॉकर पोलिसांनी उघडलं. त्यात तब्बल साडे नऊ किलो सोनं, 5 किलो चांदी, सत्तावन्न लाखांची रोकड सापडलीय. यापूर्वी चिखलीकरच्या लॉकरमध्ये 4 किलो सोनं आणि 7 कोटी रुपये सापडले होते. लाचलुचपत खात्याच्या अधिकार्‍यांनी चिखलीकरच्या राज्यभरातील संपत्तीची मोजदाद सुरु केलीय. यात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक माहिती उघड होतं आहे. (हे पण वाचा – चिखलीकरच्या डायरीत भुजबळांचं नाव ? )

चिखलीकरची मालमत्ताजिथे पोस्टींग तिथे प्रॉपर्टी… हे सूत्र आहे, कोट्यावधीची माया जमवणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या करोडपती होण्याचं…17 वर्षांच्या सेवेत त्यांनी 14 कोटींची माया जमवली. त्याशिवाय त्यांच्या मालमत्तेची किंमत बर्‍याच कोटींनी पुढे जातेय. 6 टक्के कमीशन द्या आणि बीलं काढून घ्या. फक्त एकच तत्व. याच तत्त्वाच्या आधारावर त्यांनी कोट्यावधींची प्रॉपर्टी केली.

लाचखोर अधिकार्‍यांनी बेनामी संपत्तीवर

– कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांची मालमत्तारोकड – 7 कोटी 46 लाखसोने, चांदी – 4 किलो 50 तोळेमालमत्ता – कल्याण, ठाणे येथे दोन बिअरबार, एक पेट्रोलपंप, औरंगाबाद, लातूर, जालना, मुंबई येथे मालमत्ता

शाखा अभियंता जगदिश वाघ यांची मालमत्तारोकड – 47 लाखसोने – 1 किलो मालमत्ता – नाशिकमध्ये दोन फ्लॅट आणि धुळ्यात फ्लॅट

चिखलीकरची नाशिकबाहेरची नव्याने पुढे आलेली मालमत्ता

1) वाशीत दुकानकिंमत – 68 लाखठिकाण- 17, प्लाझा, सेक्टर 19 डीक्षेत्रफळ – 681 चौरस फूट

2) बाणेरमध्ये प्लॉटकिंमत – 23 लाखठिकाण- सर्व्हे नं. 114, बाणेरक्षेत्रफळ – 491 चौरस मीटर

3) बालेवाडीत प्लॉट किंमत – 16 लाखक्षेत्रफळ – 600 चौरस मीटर

4) कोथरूडमध्ये प्लॉटकिंमत – 37 लाखठिकाण- प्लॉट नं. 8, सर्व्हे नं. 78क्षेत्रफळ – 451 चौरस मीटर

5) लोणी काळभोर येथे शेतजमीनकिंमत – 3 लाखक्षेत्रपळ – 4 आर

6) औरंगाबादमध्ये प्लॉटकिंमत – 39 लाखठिकाण- मुकुंदवाडीक्षेत्रफळ – 8 हेक्टर7) औरंगाबाद वाळूंज एमआयडीसीत अभी इंजिनिअरिंग फॅक्टरीठिकाण- 68 लाखक्षेत्रफळ – 16 हजार चौरस मीटरदोन गाळे क्षेत्रफळ – 1600 चौरस मीटर

close