आरबीआयनं केली व्याजदरात घट

January 2, 2009 1:32 PM0 commentsViews:

2 जानेवारी, मुंबई सरकारकडून दुसरं इकॉनॉमी बूस्टर पॅकेज जाहीर होण्याची शक्यता असतानाच रिझर्व्ह बँकेनंही बँकांसाठी व्याजदर कमी करून सकारात्मक पावलं उचलली आहेत. आरबीआयनं कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे सीआरआर आता अर्ध्या टक्क्यानं कमी केला आहे. कॅश रिझर्व्ह रेशो हा असा व्याजदर असतो, ज्याच्यामुळे बँकाना रिझर्व्ह बँकेकडे काही रक्कम ठेवावी लागते. आता सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो 5%असणार आहे. आणि रिव्हर्स रेपो रेट प्रत्येकी 1 %नं कमी केला आहे. रेपोरेट म्हणजे बँकाना रिझर्व्हबँकेकडून जे अर्थ सहाय्य मिळतं तो व्याजदर. अर्थात बँकाना रिझर्व्ह बँकेकडून मिळणारं कर्ज 1 %नी स्वस्त झालं आहे. बँकाना रिझर्व्ह बँकेकडून मिळणा-या कर्जाचा व्याजदर हा 5.5% असणार आहे. तसंच आरबीआय बँकाकडून काही कालावधीसाठी कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा रिव्हर्स रेपोरेट एक टक्क्यांनी कमी झाला आहे. रिव्हर्स रेपोरेट 4% असणार आहे. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपोरेट मधली कपात लगेच लागू होणार आहे. तर सीआरआर मधली कपात 17 जानेवारी 2009 पासून लागू होणार आहे. आरबीआयनं रेट्स कमी करून बँकांसाठी तर चांगली बातमी दिलीच आहे त्याचबरोबर आता बँकाकडून व्याजदर कमी होण्याची शक्यताही स्पष्ट झाली आहे. आरबीआयनं व्याज दरात घट केल्यानं चलनात 20 हजार कोटी रुपये जास्त येणार आहेत. यामुळे बँकांची गंगाजळी वाढणार आहे. एक्झिम बँकेला 50 अब्जांचं अर्थ सहाय्य मिळणार आहे.

close