अश्वनीकुमारांची होणार ‘बदली’ ?

May 9, 2013 11:10 AM0 commentsViews: 12

09 मे

कोळसा खाण घोटाळ्या प्रकरणी कायदामंत्री अश्वनीकुमार यांची उचलबांगडी करायला पंतप्रधान मनमोहन सिंग तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अश्वनीकुमार यांचा राजीनामा घेतला तर आपणसुद्धा अडचणीत येऊ, अशी भीती पंतप्रधानांना वाटतेय. त्यामुळे अश्वनीकुमार यांना काढून न टाकता त्यांचं खात बदलण्याबाबत विचार सुरू असल्याचं समजतंय. कोळसा घोटाळ्याच्या अहवालावरून बुधवारी सुप्रीम कोर्टाने अश्वनीकुमार आणि ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटींना फटकारलं होतं. त्यानंतर आज वहानवटी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्याबाबत सरकारसमोर काय पर्याय आहेत ?पर्याय 1- अश्वनीकुमारना तात्काळ राजीनामा द्यायला सांगणंपरिणाम- विरोधक अधिक आक्रमक होतील- पंतप्रधानांचा राजीनामा मागतील

पर्याय 2- कोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहणंपरिणाम- विरोधकांची आक्रमकता कदाचित कमी होईल- भाजप अंतर्गत नेतृत्वाच्या लढाईत गुंतून पडेल

पर्याय 3- अश्वनीकुमारनी स्वतःहून राजीनामा देणंपरिणाम- पवन बन्सल यांच्यावरही दबाव वाढेल- विरोधक यूपीएतल्या भ्रष्ट मंत्र्यांविरोधात मोहीम सुरू करतील

close