उन्हाचा तडाखा, नागपूरचा पारा 47 वर

May 9, 2013 3:05 PM0 commentsViews: 16

09 मे

नागपूर: गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाखा सहन करणार्‍या नागपूरकरांना आज उन्हाळ्यातल्या सर्वाधिक तापमानाला तोंड द्यावं लागत आहे. भारतातील सर्वाधिक तापमान नागपुरात 47.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. विदर्भातील इतरही शहरात पारा झपाट्याने वाढत असून उत्तर भारतातील राज्यातील येणार्‍या कोरड्या वार्‍यामुळे आणि कमी ढगांमुळे वातावरणात बदल झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. प्रचंड उकाडा आणि उन्हामुळे दुपारच्या वेळेस शहरातील बहुतांश रस्त्यांवर संचारबंदी लागल्यासारखे चित्र दिसत आहे.

close