राजस्थानचा पंजाबवर ‘रॉयल’ विजय

May 9, 2013 5:15 PM0 commentsViews: 54

09 मे

राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्ज इलेव्हनचा 8 विकेटनं धुव्वा उडवला. टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थाननं पंजाबला 145 रन्समध्ये रोखलं. पंजाबचा इन फॉर्म बॅट्समन मनदीप सिंग शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर कॅप्टन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शने तुफान फटकेबाजी करत पंजाबचा स्कोर वाढवला.

गिलख्रिस्टनं 42 तर मार्शनं 77 रन्स केले. पण त्यानंतर पंजाबच्या एकाही बॅट्समनला रन्सचा दुहेरी आकडा पार करता आला नाही. या सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारा डेव्हिड मिलर आणि डेव्हिड हसीसुद्धा झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. राजस्थानतर्फे केवॉन कूपरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

तर वॉटसन, फॉकनर आणि चांडिलीयानं प्रत्येकी 1 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. तर राजस्थानच्या इनिंगची सुरुवातही खराब झाली. राहुल द्रविड फक्त 4 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसननं तुफान फटकेबाजी करत स्कोर वाढवला. वॉटसन 31 रन्सवर आऊट झाला. तर रहाणेनं शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. त्याला साथ दिली ती संजू सॅमसननं.. सॅमसननं 47 रन्स ठोकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close