चिखलीकरच्या बँक खात्यात सापडले 35 लाख

May 10, 2013 12:54 PM0 commentsViews: 52

10 मे

नांदेड : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर इंजिनिअर सतीश चिखलीकर याच्या बँक खात्यात आज आणखी 35 लाख सापडले आहेत. नांदेडच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बँकेत सतीश चिखलीकर आणि त्याचे वडील मधुकर चिखलीकर यांच्या नावावर संयुक्त खातं आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही आणखी एक लॉकर आहे. त्याचीही तपासणी एसीबीचे अधिकारी करत आहेत. चिखलीकर आणि वाघ यांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दरम्यान, लाचखोर चिखलीकर याचे संबंध सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांचे ओएसडी संदीप बेडसे यांच्यासोबत आहेत असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

close