लातूरमध्ये ST बसमध्ये स्फोट

May 10, 2013 2:21 PM0 commentsViews: 11

10 मे

लातूर : येथील चाकूर तालुक्यात नळेगाव एसटी स्टँडमध्ये एका एसटी बसमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 ते 15 लोक जखमी झालेत. जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उदगीरहून लातूरकडे निघालेली ही बस नळेगाव स्टँडमध्ये थांबली होती. सातच्या सुमारास हा स्फोट झाला. मात्र हा स्फोट कशामुळे झाला याबद्दल अधिकृत माहिती कळू शकली नाही.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार नळेगाव स्टँडमध्ये ही बस थांबलेली होती आणि अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसलाय. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. हा स्फोट इंजिन गरम झाल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय पण इंजिनचा स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणावर असू शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे.

close