सिब्बलांकडे कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार ?

May 11, 2013 9:43 AM0 commentsViews: 10

नवी दिल्ली 11 मे : बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग आलाय. सोनिया गांधींनी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पण या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार नाही. बैठकीनंतर अहमद पटेल पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत.

पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यात दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांच्याकडे कायदा मंत्रलायची अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर सी. पी. जोशी यांच्याकडे रेल्वेमंत्रालयाचा अतिरीक्त पदभार दिला जाऊ शकतो. दुसरीकडे, पवनकुमार बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या हकालपट्टीचं श्रेय काँग्रेसनं सोनिया गांधींना दिलंय.

सोनिया आणि पंतप्रधानांमध्ये मतभेद असल्याची कबुलीही दिली जातेय. त्यामुळे आगामी काळात मनमोहन सिंग पक्षात एकटे पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, बन्सल आणि अश्वनीकुमार यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला आहे.

close