अहमदनगरमध्ये 11 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

January 2, 2009 9:58 AM0 commentsViews: 5

2 जानेवारी अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या चितळी इथे जमिनीच्या वादातून दोन गटात वाद झाल्यामुळे 11 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात माजी सरपंच, उपसरपंच यांचाही समावेश आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 12 च्या सुमारास गावातील काही लोकांनी दलित कुटुंबावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. परंतु या प्रकारानंतर पोलीस दोन दिवस येथे फिरकले देखील नाही. ज्यावेळी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असं सांगण्यात येत आहे.

close