घरकाम करणा-यांना 2 दिवसांची सुट्टी मिळणार

January 2, 2009 4:23 PM0 commentsViews: 68

2 जानेवारी घरकाम करणा-या कामगारांना यापुढे आठवड्यातून 2 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. यावेळच्या हिवाळी विधीमंडळ अधिवेशनात घरकामगार कायदा पास झाला. त्यानुसार घरकाम करणा-या कामगारांना दोन दिवसांची सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे. इतकंच नाही, तर त्यांना वार्षिक सुट्‌ट्या, प्रॉव्हिडंट फंड, आरोग्यविमा यांसारख्या सुविधाही मिळणार आहेत. या कामगारांचा महिन्याचा पगार त्यांचे मालकच देतील. मात्र या सुविधांचा लाभ त्यांना सरकारकडून मिळतील. असंघटित कामगारांना सुरक्षा पुरवणं, इतकाच या योजनेचा हेतू नाही. तर बालकामगारांवर नजर ठेवणंही या योजनेच्या अजेंड्यावर आहे. सरकारी आकडेवारीनुसार एकट्या मुंबईत पाच लाख घरकाम करणारे कामगार आहेत. त्यात बहुसंख्य महिला आहेत. या योजनेचा त्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

close