आयसीसीनं क्रिकेट हॉल ऑफ फेमची यादी जाहीर केली

January 2, 2009 5:24 PM0 commentsViews: 4

2 जानेवारीआंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं म्हणजे आयसीसीनं नव्यानं क्रिकेट हॉल ऑफ फेमची यादी जाहीर केली आहे. आणि त्यात भारताच्या 3 माजी दिग्गज कॅप्टन्सचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या शतकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त जगभरातील महान खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. आणि यासाठीच ही हॉल ऑफ फेमची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताला 1983 चा वर्ल्ड कप जिंकून देणा-या कपिल देवसह सुनिल गावस्कर आणि बिशन सिंग बेदी यांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीतील 52 इतर नावात सर डॉन ब्रॅडमन, इयान बॉथम, रिचर्ड हॅड्ली आणि गॅरी सोबर्स या क्रिकेटमधील दिग्गजांचाही समावेश आहे. आयसीसी हॉल ऑफ फेम ठरणा-या खेळाडूंना आयसीसीची कॅप सन्मानचिन्ह म्हणून देण्यात येणार आहे. तसेच यापुढे दरवर्षी नवीन नावांचा या यादीत समावेश करण्यात येईल.

close