ओमर अब्दुल्ला हेच 5 वर्ष मुख्यमंत्री असणार

January 2, 2009 5:33 PM0 commentsViews: 6

2 जानेवारी काश्मीरजम्मू आणि काश्मीरमध्ये मुख्यमंत्रीपदाचं रोटेशन असणार नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं. पण काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असणार आहे. आणि तोसुद्धा जम्मू भागातून असणार आहे. नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री असणार यावर पूर्वीच शिक्कामोर्तब झालं होतं. आता ते 5 वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार हे निश्चित झालं आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार अस्तित्वात येतंय. या आघाडीच्या फॉर्म्युल्याबद्दल उत्सुकता होती. मुख्यमंत्रीपदाचं रोटेशन किंवा नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असे दोन पर्याय होते. दरम्यान, शपथविधी समारंभाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत.

close