कृतिका नडिगनं जिंकली राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा

January 2, 2009 12:45 PM0 commentsViews: 6

2 जानेवारी राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेवर यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे वर्चस्व राहीलं. महाराष्ट्राच्या कृतिका नडिगनं शेवटच्या फेरीत बाजी मारत ही स्पर्धा आपल्या नावावर केली.महाराष्ट्राच्या बुध्दिबळ जगताला कृतिकाकडून मोठ्या यशाची खात्री होती.आणि कृतिकानंही यंदाची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकत हा विश्वास सार्थ ठरवला. या विजेतेपदासाठी कृतिकाला जबरदस्त मेहनत द्यावी लागली.कृतिकाकडे महिला ग्रॅण्डमास्टरचा किताब आहे.आता तीचं यापुढंच टार्गेट आहे ते आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्याचं.

close