शिवराज पाटील वादात सापडण्याची शक्यता

January 3, 2009 10:07 AM0 commentsViews: 1

3 जानेवारी औरंगाबादमाजी गृहमंत्री शिवराज पाटील औरंगाबाद दौ-यावर आहेत. तिथे पत्रकारांशी बोलताना संसद हल्ला प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या अफजल गुरुला फाशी देण्याची एवढी काय घाई आहे, असं ते म्हणाले. अफजलच्या फाशीवर कुणीही राजकारण करू नये. सध्या 30 ते 35 फाशी माफीचे अर्ज टेबलावर पडून आहेत. त्यासंदर्भात कुणीही बोलत नाही. तसंच राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भातल्या फाईल्सही पडून आहेत असंही पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे माजी गृहमंत्री शिवराज पाटील आता पुन्हा वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे.

close