वेध पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे

January 3, 2009 12:57 PM0 commentsViews: 2

3 डिसेंबर, पुणे सातवा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 8 ते 15 जानेवारी रोजी रंगणार आहे. 42 देशांचे 150 सिनेमे रसिकांना यावेळी पाहायला मिळतील. यंदा सुलोचना दिदी, शशी कपूर आणि हेमा मालिनी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार्‍या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशींचा सत्कार करण्यात येणार आहे. जागतिक सिनेमे या विभागात 30 देशातील 109 सिनेमे दाखवले जातील. तर मराठी सिनेमा विभागामध्ये गंध, दुखांचं श्वापद, हरिश्चंद्रांची फॅक्टरी, जोगवा, बाईमाणूस, आणि घो मला असला हवा या सिनेमांचा समावेश आहे. या फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ठ जागतिक सिनेमा असाही पुरस्कार ठेवलायआणि त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला संत तुकाराम अ‍ॅवॉर्ड दिलं जाईल. तसंच, सर्वाेत्कृष्ठ मराठी सिनेमा आणि त्याच्या दिग्दर्शकाला प्रभात पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

close