युवकांनी घेतली 26/11शहिदांपासून प्रेरणा

January 3, 2009 6:54 AM0 commentsViews: 46

3 जानेवारी नागपूर प्रशांत कोरटकर मुंबईच्या हल्ल्यात अतिरेक्यांशी लढतांना अनेक पोलीस आणि जवान शहीद झाले.देशासाठी आपलं बलिदान देणा-या शहिदांपासून अनेक युवकांनी प्रेरणा घेतली आहे. सद्या गोंदिया पोलीस मैदानावर कोब्रा बटालियनची भरती चालू आहे. या भरतीमध्ये युवकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळाला.भरतीबाबत या तरुणांना विचारलं असता मुंबईवरच्या हल्ल्यात पोलीस आणि एन एस जीच्या जवांनांनी तासन तास अतिरेक्यांशी लढतांना आपले प्राण पणाला लावले. त्यांचीच प्रेरणा आम्हाला मिळाली असे हे तरुण सांगतात. पोलीस दलात वेगळ्याच अपेक्षेने भरती होण्यासाठी येणा-यांपेक्षा या युवकांचा हेतू नक्कीच उदात्त आहे. मात्र सरकारनंही याची जाण ठेवायला हवी आहे.

close