वॉर्नच्या जीवनावर निघालाय म्युझिकल शो

January 3, 2009 12:59 PM0 commentsViews:

3 जानेवारीलेग स्पिनचा जादूगार म्हटल्यावर डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे शेन वॉर्न. क्रिकेटमधून भलेही तो रिटायर्ड झाला असेल, पण आजही तो ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर आहे.या लोकप्रियतेमुळेच की काय त्याच्यावर एक म्युझिकल शो तयार झाला आहे. त्यातून वॉर्नचं संपूर्ण आयुष्य आपल्याला पहायला मिळणार आहे.शेन वॉर्न मैदानात गाजला तितकाच मैदानाबाहेरही. त्याचं आयुष्यही त्याने टाकलेल्या बॉलसारखं कधीही सरळ गेलं नाही. प्रत्येक वळणं अगदी सिनेमासारखी आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियन रंगभूमीवरचा प्रख्यात कलाकार एडी परफेक्टनं शेन वॉर्नचं हे आयुष्य एका म्युझिकल शोच्या रुपानं जगासमोर आणायचं ठरवलं आहे.

close