बच्चनालिया पुस्तकाचं प्रकाशन झालं

January 3, 2009 5:07 PM0 commentsViews: 2

3 जानेवारी मुंबईअमिताभ बच्चनच्या फॅन्ससाठी एक खूशखबर. बच्चनालिया या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच एनसीपीए इथे झालं. पत्रकार भावना सोमय्या आणि ओसियान्स सेंटरनं मिळून बिग बीवरचा रिसर्च या पुस्तकात एकत्रित केला आहे. त्यात बिग बीची फिल्मोग्राफी, त्यांच्या सिनेमांची दुर्मिळ पोस्टर्स सर्व काही या पुस्तकात आहे. आमीर खानच्या हस्ते यावेळी अमिताभ बच्चन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमिताभच्या सिनेमांच्या पोस्टर्सचं प्रदर्शनही भरवलंय. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम खुलून गेला होता.

close