मुंबई हल्ल्यात आयएसआयचा हात

January 3, 2009 5:58 PM0 commentsViews: 8

3 जानेवारी दिल्लीभारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धचे पुरावे एकत्र करून त्यांची यादी बनवली आहे. पण मुंबईवर झालेल्या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचाही हात असल्याचे पुरावेही भारताला मिळाले आहेत. भारताची बाजू जगाला पटवून द्यायला ही यादी घेऊन गृहमंत्री पी चिदंबरम स्वतः अमेरिकेला जाणार आहेत.मुंबईत झालेल्या हल्ल्यांत लष्कर ए तोयबाचा हात होता याचे कित्येक पुरावे मिळाले आहेत. पण मुंबई हल्ल्यांत आयएसआय या पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेचाही मोठा हात होता याचे सबळ पुरावे भारताला मिळाले आहेत.तसंच आणखी पुराव्यांची यादी भारताकडे तयार आहे. ती पाकिस्तान तसंच अमेरिका, ब्रिटन आणि अन्य काही देशांना दिली जाणार आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यासाठी गृहमंत्री पी चिदंबरम पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत. त्यापूर्वी शनिवारी दुपारी त्यांनी अमेरिकेचे राजदूत डेव्हिड मलफर्ड यांची भेट घेतली. आणि पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचं आवाहन केलं. पाकिस्तानने मुंबईवरच्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना ताबडतोब भारताच्या हवाली करावंअशी मागणी भारताने पुन्हा एकदा केली आहे.पण भारताची ही मागणी पाकिस्तान मान्य करेल, याची शक्यता कमीच आहे. कारण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं की आरोप सिद्ध झाले तरी एकही दहशतवादी भारताकडे सोपवला जाणार नाही. पण अमेरिकेच्या एफबीआयची टीमही पाकिस्तानात आहे. त्यांना मिळालेली माहिती आणि भारताने दिलेले पुरावे जगासमोर आले की पाकिस्तान फार काळ दहशतवाद्यांना संरक्षण देऊ शकणार नाही.

close