राष्ट्रवादीला हवी आहे भूमिहीनांसाठी कर्जमाफी

January 4, 2009 8:43 AM0 commentsViews: 7

4 जानेवारी आता भूमीहीन शेतक-यासाठी कर्जमाफी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडे मागणी करणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर आर पाटील यांनी सांगितलंय. महाराष्ट्रात जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आहे. त्याच्याकडून अजून 1800 कोटींच्या कर्जाची थकबाकी राहिलेली आहे ती कर्ज माफ करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिका-याच्या बैठकीत दुर्बल घटकांचे कर्ज माफ करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही मागणी स्पष्ट केली.निवडणुका जवळ आल्यामुळे शेतकरीवर्गाची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही काँगेसचे परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकरण सद्या सुरू आहे.

close