अमेरिकेत शिक्षणासाठी जाणा-याची संख्या रोडावतेय

January 4, 2009 8:01 AM0 commentsViews: 8

4 जानेवारी नवी दिल्ली दीपा बालकृष्णन भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा मूड बदललेला दिसतो. अनेक विद्यार्थ्यांना आता भारतात राहूनच शिक्षण घ्यायचं आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतल्या जागतिक मंदीमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.दरवर्षी लाखो विद्यार्थी भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जातात.2008 मध्ये अंदाजे 95 हजार विद्यार्थी अमेरिकेत गेले होते. पण 2009 मध्ये हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. जीआरईसाठी 2007 मध्ये 74 हजार विद्यार्थ्यांनी आणि गेल्यावर्षी 49 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. टाईम बॅगलोर सेंटरचे डायरेक्टर अजय अरोरा सांगतात, परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणा-या मुलांची संख्या कमी होण्यामागे दोन कारणं आहेत. एकतर जागतिक मंदी आणि दुसरं म्हणजे डॉलर्सचं मूल्य 50 रुपये वाढलंय. त्यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च 25 %नी वाढतो.आणि तो परवडणारा नाही. मंदीमुळे अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतेय, ही गोष्ट खरी आहे.पण भारतीय टॅलेन्ट भारतातचं राहिल्यामुळे भारताला नक्कीच याचा चांगला फायदा होऊ शकतो.

close