नांदेडचं जिल्हाधिकारी कार्यालय आगीत जळलं

January 4, 2009 4:30 AM0 commentsViews: 2

4 जानेवारी, नांदेड संदीप काळेनांदेडमधल्या किनवट जिल्ह्यातल्या उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयाला पहाटे 3 च्या सुमारास आग लागली आहे. या आगीत उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय संपूर्णत: जळलं आहे. लाखो रुपयांची सामग्री आगीत जळून खाक झाली आहे. काही अज्ञात लोकांनी ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.किनवट जिल्ह्यातल्या उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयात खिमाईत नगर, माहूर, किनवट, हातगाव अशा चार तालुक्यांचा कारभार चालतो. दरवर्षी या जिल्हाधिकारी कार्यालयातून चार हजार जातीची प्रमाणपत्र दिली जातात. या जातीच्या प्रमाणपत्रांचे भ्रष्टाचार पुढे आले आहेत. त्यामुळे पुरावे जाळण्यासाठी आग जाणुनबुजून लावली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जिथे आग लागली आहे त्या नगरपरिषदेकडे आग विझवण्याची काही साधनंच नव्हती. कागदपत्र जशी जळून खाग झाली आणि आसपासच्या लोकांना जशी लागलेल्या आगीची कल्पना आली तशी लोकांनी आग विझवली आहे.

close