सोलापूर-हैद्राबाद हायवे अपघातात 5 ठार, 4 जखमी

January 4, 2009 3:37 AM0 commentsViews: 19

4 जानेवारी, सोलापूर सिद्धार्थ गोदामसोलापूर-हैद्राबाद हायवे वर रात्री झालेल्या अपघातात 5 जण ठार झालेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक बसल्यानं हा अपघात झाला आहे. हा अपघात रात्री 12. 30 वाजता झाला.अपघातात अक्कलकोटजवळील नन्हेगावातील सुरेश गायकवाड, धानप्पा गायकवाड, गणेश बनसोडे, अर्जुन गायकवाड, भाईजान नदाफ हे पाच जण ठार झाले आहेत. सोलापूर-हैद्राबाद हायवेवर झालेल्या अपघाताचं स्वरुप गंभीर आहे. हा अपघात इतका गंभीर आहे की टेम्पोचे प्रत्येक भाग वेगळे होऊन ते रस्त्यावर वििखुरले आहेत. धडक इतकी जोराची होती की अपघातात 3 लोक जागीच ठार झाले आणि दोघं उपचारा दरम्यान ठार झाले आहेत. या अपघातातल्या 4 जखमींपैकी दोघांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे तर दोघांची प्रकृती सामान्य आहे. गेल्या काही महिन्यात या ठराविकपट्टयामध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. सोलापूर ते बोरामनी हा पट्टा रात्रीच्यावेळी ड्रायव्हिंगसाठी असुरक्षित समजला जात आहे. सोलापूर ते बोरामनी पट्‌ट्यात पुणे, हैद्राबादकडे जाणा-सा, येणा-या गाड्यांची जोरदार वर्दळ चालू असते. प्रत्येकालाच आधीच पोहोचायचं असतं. त्यामुळे जोतो अरुंद रस्त्यावरून घाईनं वाहन चालवत असतो. गेल्या 2 महिन्यात या पट्‌ट्यात जवळ जवळ दीडशे अपघात झालेले आहेत.

close