नागपूरमध्ये एलकुंचवार आणि ग्रेस एकत्र

January 4, 2009 5:30 AM0 commentsViews: 2

4 जानेवारी, नागपूर नागपूरकरांसाठी कालची संध्याकाळ कायम स्मरणात राहील अशी ठरली. कारण ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ कवी ग्रेस हे दिग्गज काल एकाच व्यासपीठावर एकत्र आले. निमित्त होतं प्रसिध्द चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या चित्रांच्या प्रिंट्सच्या प्रकाशनाचं. याचबरोबर कलेपासून कलेकडे या बोधनाच्या दुस-या पुस्तकाचं प्रकाशनही एलकुंचवार यांच्या हस्ते झालं. यावेळी एलकुंचवार आणि ग्रेस यांच्या शब्दांनी उपस्थितांची संध्याकाळ संस्मरणीय केली.

close