कोल्हापुरात बोगस सर्टिफिकेट बनवणा-यांना अटक

January 4, 2009 7:30 AM0 commentsViews: 3

4 जानेवारी कोल्हापूरकोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेनं बनावट सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट तयार करणा-या चौघाजणांना अटक केली आहे. हे आरोपी गरजू विद्यार्थ्यांना लागणारं सर्टिफिकेट तत्काळ तयार करून देतात, हे पोलिसांना समजलं होतं. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी आपल्या सहका-यांसह सापळा रचून या चौघांना अटक केली.या आरोपींंनी आतापर्यंत शंभरहून अधिक मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेटस तयार करून दिल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सर्टिफिकेटचाही समावेश आहे.पोलिसांनी या आरोपींकडून कॅम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर असा माल जप्त केला आहे. यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

close