लालूप्रसाद यादवांवर बनली कार्टुन सिरीज

January 4, 2009 6:11 AM0 commentsViews: 9

4 डिसेंबर, पाटणाप्रभाकर कुमार कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं लालूप्रसाद नेहमीच सगळ्यांचं मनोरंजन करत असतात. लालूंनी आता अ‍ॅनिमेशन इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला आहे. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव चक्क एका कार्टुनच्या रूपात दिसणार आहेत. कार्टुनिस्ट पवनने लालूंचं कार्टुन बनवलं असून त्यांना आवाज शशी या डबींग आर्टिस्टनं दिला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या नावाची मोहोर आणखी एका क्षेत्रावर उमटवली आहे. त्या क्षेत्राचं नाव आहे अ‍ॅनिमेशन. अ‍ॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये लालूंनी एका कार्टुनच्या रूपात प्रवेश केला आहे. त्याची पहिली क्लीप लवकरच मार्केटमध्ये लाँच केली जाणार आहे. लालूंना कार्टुनच्या रूपात सादर करण्याच्या कल्पनेमागे पवनचं डोकं आहे. " टॉम अ‍ॅण्ड जेरी या कार्टुन्स प्रमाणं आता लालूंचं कार्टुन बाजारात आणलं जाणार आहे. टॉम अ‍ॅण्ड जेरीप्रमाणं ते लोकप्रिय होईल अशी आशा आहे, " असं पवन म्हणाला. लालूंचं हे कार्टुन बनवण्यासाठी पवन आणि त्याच्या तीन सहकार्‍यांनी मिळून सहा महिन्यांचा काळ खर्ची घातला. कार्टुनिस्ट पवन यांनी लालूंचं कार्टून रेखाटलंय, तर त्याचा मित्र शशी यांनी त्याला लालूंचा आवाज दिला आहे. " माझ्या बिहारी भाषेचा लालुंच्या आवाजासाठी चांगला उपयोग झाला आहे, " असं डबिंग आर्टिस्ट शशीचं म्हणणं आहे. लालूंवरचा हा अ‍ॅनिमेशनपट मार्केटमध्ये आणण्यासाठी पवन आणि त्याची टीम आता स्पॉनसरच्या शोधात आहे. विविध खेळण्यांच्या रूपात लालूंनी त्या मार्केटमध्ये आशादायी केलाय. पण आता कार्टुनच्या रूपानं लालू प्रत्येकांच्या घरात जाऊन मुलांचं आकर्षण ठरतील, यात शंका नाही. लालूंच्या कार्टुनची झलक पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close