रंकाळा तलावाचं अस्तित्व धोक्यात

March 12, 2013 7:15 PM0 commentsViews: 42

4 जानेवारी कोल्हापूरप्रताप नाईककोल्हापूरच्या रंकाळा तलावाभोवती कोल्हापुरातील नागरिक, शाळेतील मुलं, समाजसेवी-पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली. संपूर्ण रंकाळ्याला केंदाळानं घेरलं आहे. त्यामुळे रंकाळ्याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.महापालिका प्रशासनाला जाग यावी या उद्देशानं रंकाळ्यावर मानवी साखळी तयार करण्यात आली.कोल्हापूर महानगरपालिकेला राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत साडे आठ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.पण या निधीचा वापर योग्य रितीनं होत नाही. त्यामुळे रंकाळ्याची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांना मात्र शरमेनं मान खाली घालावी लागत आहे. केंदाळ काढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडे कायमस्वरुपी यंत्रणा नाही.त्यातच शहरातील 1/3 सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळतं. त्यामुळे रंकाळ्याची ही अवस्था झाली आहे.पण प्रशासन मात्र गप्प आहे.कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रशासनानं रंकाळ्याचं संवर्धन करण्यासाठी योग्य पावलं उचललेली नाहीत म्हणून आज मानवी साखळीच्या रुपानं कोल्हापूरकरांचा उद्रेक दिसून आला आहे. या पुढच्या काळात महापालिका प्रशासनानं योग्य पावलं उचलली नाहीत तर कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरं जावं लागेल हे मात्र नक्की.