पूँछमध्ये चकमक सुरूच

January 7, 2009 6:32 AM0 commentsViews: 1

7 जानेवारी, पूँछपवन बाली गेल्या सात दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या पूँछ भागात सुरक्षा दलाच्या जवानांची अतिरेक्यांसोबत चकमक सुरू आहे. सकाळपासून अतिरेक्यांचा गोळीबार पुन्हा चालू झालाय. कदाचित शस्त्रात्र साठा वाचवण्याची आता त्यांची धडपड सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. दाट धुकं आणि घनदाट जंगल असलेल्या या भटिधार भागात अतिरेक्यांना लपण्यासाठी नैसर्गिक गुहाही आहेत. त्यामुळंच कारवाई करताना सैनिकांना अडचणी येतायत. आतापर्यंतच्या कारवाईत 4 अतिरेक्यांना ठार करण्यात आलय, तर तीन जवान शहीद झाले आहेत.पाकिस्तानातून आलेले 10 अतिरेकी गोळीबार करीत असून त्यांच्याजवळ प्रचंड शस्त्रसाठा असल्याचं सुरक्षा दलानं सागितलं आहे. लपलेल्या अतिरेक्यांना काही स्थानिक नागरिकांची मदत मिळत असल्याचाही संशय आहे. जंगलातल्या कपारिंमध्ये लपलेल्या अतिरेक्यांच्या शोधासाठी हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात येतेय. लष्कर ए तैय्यबा आणि जैश ए मोहम्मद चे हे अतिरेकी आहेत. 31 डिसेंबरला सुरू झालेली ही चकमक आत्तांपर्यंतची सर्वात मोठी चकमक असल्याचंही सुरक्षा दलानं म्हटलंय. अजूनही चकमक चालूच आहेत.

close