एफबीआयनं पाकिस्तानला मुंबई हल्ल्याचे पुरावे दिले

January 4, 2009 5:47 PM0 commentsViews: 3

4 जानेवारी मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याबाबतचे पुरावे अमेरिकेच्या एफबीआयनं पाकिस्तानला दिलेत. लंडनच्या संडे टाईम्सनं ही बातमी दिली आहे. मुंबई हल्ल्यातले दहशतवादी आणि त्यांचे लष्कर-ए-तोयबाचे पाकिस्तानातले सूत्रधार यांच्यात झालेल्या संभाषणाचा तपशील त्यात आहे. पण, मुंबई हल्ल्यात सहभागी असणा-या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यायला पाकिस्ताननं पुन्हा एकदा नकार दिलाय. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मुल्तानमध्ये एका पत्रकारपरिषदेत भारताची मागणी धुडकावून लावली. दहशतवादी अमेरिकेच्या ताब्यात देणं आणि भारताची मागणी यात तुलना होऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. अमेरिकेप्रमाणं भारत आणि पाकिस्तानात याच्यात प्रत्यार्पण करार नसल्याचंही कुरेशी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री रिचर्ड बाऊचर पाकिस्तानला भेट देत आहेत. दहशतवादाविरोधात कडक कारवाई करण्यासाठी बाऊचर पाकिस्तानवर दबाव आणण्याची शक्यता आहे.

close