राणे मुख्यमंत्री भेट

January 5, 2009 5:29 AM0 commentsViews: 3

5 जानेवारी मुंबईकाँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. 6जानेवारीला नारायण राणे आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. त्या अगोदर मुख्यमंत्री अशोक चव्हाण राणेंच मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतंय. सकाळी 9.00 वाजता राणेंनी अशोक चव्हाण यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे काँग्रेस अजूनही नारायण राणे याचं मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसतं. तर दुसरीकडे राणेंनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली होती तरी ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यामुळे राणेंही दोन पावलं मागे आले आहेत असं वाटतं.

close