ग्लोबल मार्केटमध्ये तेजी

January 5, 2009 6:59 AM0 commentsViews: 4

5 जानेवारी मुंबईग्लोबल मार्केटमध्ये नजर फिरवली तर सर्वत्र तेजीचं वातावरण दिसेल. नव्या वर्षातल्या या दुस-याच आठवड्याच्या सुरुवातीला सर्वच मार्केटचा मूड चांगला दिसतोय. एशियन मार्केटमध्येही 2 ते 3 टक्क्यांची तेजी दिसत आहे. अमेरिकन मार्केट्सनंही चांगलीच उसळी घेतली आहे. भारतीय बाजारात गेल्या शुक्रवारी दुसरं बूस्टर पॅकेज जाहीर झालं तसंच आरबीआयनंही रेट कमी केल्यामुळे हा फरक पडेलेला दिसतोय.बिझनेस न्यूजइकॉनॉमिक टाईम्सइकॉनॉमिक टाईम्सनं पहिल्या पानावरच्या चित्रात ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या तीन घुमटांऐवजी एक व्हॅटिकन चर्चचं घुमट, दुसरं क्रेमलिनचं आणि तिसरं वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसचं घुमट आहे असं दर्शवणारं चित्र आहे. या चित्रातून इटीनं जागतिक एकात्मतेचा संदेश दिलाय.मिंटमिंटमध्ये हेडलाईनच्या बातमीत चर्चा आहे ती आयसीआयसी बँकेच्या सीईओ चंदा कोचर आल्यानंतर आता त्यांची जागा कोण भरून काढणार याची आहे. बँकेच्या सर्वच टॉप मॅनेजमेंटविषयी या बातमीत लिहिलेलं आहे. तसंच कोचर यांच्या जागी संजय चॅटर्जी यांची वर्णी लागू शकते असंही म्हटलंय.बिझनेस स्टँडर्डसत्यमच्या शेअरधारकांनी आता विलिनीकरणाची मागणी केलीय. बिझची दुसरी बातमी भारती, टाटा ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज अशा काही बड्या कंपन्याच्या मार्केट कॅपिटलबाबतची आहे आणि त्यानुसार कोण शर्यतीत पुढं आहे याचं विश्लेषण त्यांच्या बातमीत केलं आहे.

close