विश्व साहित्य संमेलनालाही मंदीचा फटका

January 5, 2009 7:25 AM0 commentsViews: 1

5 जानेवारी पुणेपहिल्या विश्व साहित्य संमेलनालाही जागतिक मंदी आणि मुंबईवर झालेला हल्ला यांचा फटका बसला आहे. संमेलनाला जाणा-यांची नोंदणी कमी झाली आहे त्याबरोबरच काही लोकांचा व्हिसाही नाकारला गेला आहे. विश्व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि बे एरिया मंडळाचे अध्यक्ष संदिप देवकुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकूण 2500 लोक संमेलनाला हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र भारतातून निव्वळ 325 लोकांनीच नोंदणी केली. तसंच इतर देशांमधूनही फक्त 425 लोकच येणार आहेत . त्यामुळे संमेलनाची जागा देखील बदलण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या लोकांमधल्या 20% लोकांचे व्हिसा नाकारण्यात आले आहेत.

close