पाकिस्तानला पुरावे सादर

January 5, 2009 11:45 AM0 commentsViews: 4

5 जानेवारीभारतानं पाकिस्तानकडे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात महत्वाचे पुरावे सोपवले आहेत. पाकिस्तानचे हाय कमिशनर शाहिद मलिक यांच्याकडे हे पुरावे सोपवण्यात आले. केवळ एवढ्यावरच भारत थांबणार नसून इतर देशांनाही हे पुरावे देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यामुळे पाकिस्तानवर दबाव चांगलाच वाढला आहे."26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातले पुरावे आम्ही पाकिस्तानकडे सोपवले आहेत. त्यावर पाकिस्ताननं लवकरात लवकर कारवाई करावी. तरच त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवता येईल." असं पुरावे सादर केल्यावर प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं

close