जाफरची ट्रिपल सेंचुरी

January 5, 2009 12:01 PM0 commentsViews: 3

5 जानेवारीसौराष्ट्र बरोबरच्या सेमी फायनल मॅचमध्ये मुंबईनं सहा विकेट गमावत 637 रन्सचा डोंगर उभा केला आहे. मॅचच्या दुसर्‍या दिवसाचा हिरो ठरला तो वासीम जाफर. जाफरनं कॅप्टन इनिंग खेळत ट्रिपल सेंच्युरी ठोकली. रणजीमधली ही त्याची दुसरी ट्रिपल सेंच्युरी ठरली. आपल्या मॅरॉथोन खेळीत त्यानं तब्बल 27 फोर मारले. पण तीनशे एक रन्सवर असताना तो आऊट झाला. जाफर बरोबरच सचिन तेंडुलकरनेही फर्स्ट क्लास क्रिकेटमधली 67वी सेंच्युरी केली. यात सचिनने सात फोर तर तब्बल सहा सिक्स मारले. 122 रन्सवर असताना सचिन रिटायर्ड झाला. रविवारच्या एक आऊट 268 रन्सच्या स्कोअरवर मुंबईने आज इनिंग पुढे सुरु केली. पण अजिंक्य रहाणे कालच्या स्कोअरमध्ये जेमतेम वीस रन्सची भर घालून 85 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर मात्र जाफर आणि सचिनची जोडी जमली. सचिननेही आपली 67 वी सेंच्युरी फटकावली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी दोनशेपेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली.

close