विजेसाठी हवी केंद्राची मदत

January 5, 2009 12:12 PM0 commentsViews: 3

5 जानेवारी, रत्नागिरीकेंद्र सरकारने आर्थिक मदत केली तरच, येत्या मार्च पर्यंत राज्याला अठराशे मेगावॅट वीजेचं व्यवस्थापन करता येईल असं उर्जा मंत्री सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीतल्या जिंदाल उर्जा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पमधूनही ऑक्टोबर 2009 पर्यंत 300 मेगावॅट वीज महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहे. 26 जानेवरीपर्यंत आणखी तीनशे मेगावॅट वीज दाभोळमधून मिळेल अशी सरकारची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त वीजेच्या व्यवस्थापनासाठी राज्याला तातडीने केंद्राच्या मदतीची अपेक्षा आहे. त्यासंबंधीचा करार येत्या आठ दिवसात राज्यसरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे. "आम्हाला काही निर्णय केंद्र सरकारच्या सहकार्याने घ्यावे लागतील. प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली जर बैठक झाली आणि काही महाराष्टातील विजनिर्मितीसंदर्भात योग्य ते निर्णय घेतले गेले, तर मार्च अखेर्पर्यंत आम्ही 1800 मेगावॅट विजेची निर्मिती करू शकतो" असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

close