गजनीचं रेकॉर्डब्रेक कलेक्शन

January 5, 2009 12:34 PM0 commentsViews: 6

5 जानेवारीआमीर खानचा गजनी रिलीज होऊन एक आठवडा उलटला. पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याची घोडदौड सुरूच आहे. आतापर्यंत गजनीचं कलेक्शन झालंय एकशे सत्तर कोटी रुपये. यामध्ये ओव्हरसीज कलेक्शनचा वाटा आहे पासष्ट लाख डॉलर्स.केवळ उत्तर अमेरिकेतून गजनीने एकोणीस लाख डॉलर्सचा गल्ला जमवला आहे. स्टुडिओ 18 ने रिलीज केलेल्या गजनीने कलेक्शनचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा थिएटर्सकडे खेचण्याचं कामही गजनीने केलंय. आता यानंतर या वर्षातला पहिला मोठा सिनेमा 'चांदनी चौक टू चायना' हा अक्षय कुमारचा सिनेमाही सोळा जोनवारीला रिलीज होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत गजनी हाऊसफुल्ल गर्दीत सुरु राहील आणि आणखी बरेच रेकॉर्ड ब्रेक करेल अशी ट्रेड अ‍ॅनलिस्टना खात्री आहे.

close