2009 हे खगोलशास्त्र वर्ष

January 5, 2009 11:14 AM0 commentsViews: 90

5 जानेवारी मुंबईजगातली सगळ्यात मोठी 10 मीटर व्यासाची दुर्बिण सध्या अमेरिकेत बनवली जात आहे. पण दुर्बिणीचा वापर संशोधनासाठी सगळ्यात पहिल्यांदा केला तो खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओने. तेव्हा त्याची दुर्बिण होती ती फक्त अडीच सेंटीमीटर व्यासाची.1602 साली त्याने दुर्बिणीची निरीक्षणं जाहीर केली. त्या घटनेला 400 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 2009 हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.होमी भाभा शिक्षण संस्थेमधले संशोधक डॉ. अनिकेत सुळे सांगतात, त्याच्याआधी असं वाटायचं की पृथ्वी हीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. पण गॅलिलीओच्या निरीक्षणांनी हे दाखवलं की सूर्य केंद्रस्थानी आहे.चंद्रावर खळगे आहेत. शनीला कडं आहे.गॅलिलिओच्याही आधी 1602 मध्ये दुर्बिणीचा शोध लागलेला होता. पण त्या दुर्बिणीचा वापर सैन्यात व्हायचा.

close