गोव्यात सामुहिक बलात्काराचा आरोप

January 5, 2009 3:44 PM0 commentsViews: 141

5 जानेवारी, गोवापरदेशी पर्यटकांसाठी गोवा दिवसेंदिवस अधिकच असुरक्षित होत चाललं आहे. अमली पदार्थ देवून बलात्कार झाल्याची शंका 24 वर्षीय डच तरुणीने व्यक्त केली आहे. गोव्यातल्या अंजुना बीचवर नायजेरीयन तरुणांनी बलात्कार केल्याचं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला मेडिकल तपासणीसाठी पाठवलं आहे. तसंच विनयभंगाची तक्रारही दाखल करून घेतलीय. मात्र सुरुवातीला हद्दीचा मुद्दा पुढं करत पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. आता मेडिकल रिपोर्टनंतरच बलात्काराबाबत तक्रार नोंदवली जाईल, असं पोलिसांनी सांगितलंय.

close