नक्षलवाद्यांकडून ड्रग्जचा व्यापार

January 5, 2009 3:46 PM0 commentsViews: 59

5 जानेवारी, ओरिसाओरिसातल्या नक्षलवाद्यांना आता नक्षलवादी कारवायांसाठी फंड गोळा करण्याकरता नवा मार्ग मिळाला आहे. अमली पदार्थांच्या व्यापारातून पैसे जमवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. जस्टीस पी के मोहंती कमीशनच्या रिपोर्टनुसार अनुसार ओरिसातल्या 9 नक्षलवादी जिल्ह्यांमध्ये गांजाचं उत्पादन होतं..छत्तीसगड तसचं आंध्र प्रदेशातून याची निर्यात होते. कित्येक एकरामध्ये पसरलेल्या गांजाच्या शेतीतून करोडो रुपये त्यांना मिळतात. त्यातून मालकनगिरी जिल्ह्यात नक्षलवादी दहशतवाद पसरवतात. आणि प्रशासनाकडे त्यांना थोपवण्याचा दुसरा कोणता मार्ग नाही."संपूर्ण जिल्ह्यात मिळून माझ्याकडे फक्त नऊ जणांचा स्टाफ आहे, आणि एवढ्याचं जणांना घेऊन आम्ही लढू शकत नाही" असं एक्साईज इन्स्पेक्टर बिजयकुमार मिश्रा यांनी सांगितलं.अपुर्‍या सुरक्षायंत्रणेमुळे या जिल्ह्यांमध्ये अनधिकृतपणे गांजाची शेती होते..आणि कुणीचं काही करु शकत नाही. कारण प्रशासनाचंचं याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे.

close