नाशिकमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

January 5, 2009 4:26 PM0 commentsViews: 1

5 जानेवारी, नाशिकनाशिकमधल्या इप्कॉस कंपनीतल्या दहा कामगारांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिकच्या कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात ही घटना घडलीय. ट्रेनी म्हणून हे कामगार या कंपनीत काम करत होते. त्यांना टप्प्याटप्प्यानं नोकरीवरून काढण्यात येत होतं. त्याबद्दल त्यांनी कामगार उपायुक्तांकडे दाद मागितली होती. पण उपायुक्तांनी भेट नाकारली म्हणून या कामगारांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी तीन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात करण्यात आलं आहे. कंपनीत कामगार संघटना स्थापन केली म्हणून मॅनेजमेंटनं कामगारांना कमी केल्याची तक्रार या कामगारांनी केली आहे."आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारचा कामगारांचा प्रश्न नाही. उलट यापैकी काही कामगारांना येत्या काळात कायम करणार होतो" असं इप्कॉन कंपनीचे पर्सनल मॅनेजर अनिल दैठणकर यांनी म्हटलं आहे. तर मॅनेजमेंटच्या त्रासाबद्दल किंवा कंपनीत प्रॉब्लेम असल्याबद्दल कोणत्याही स्वरूपाचं निवेदन आमच्याकडे आलेलं नाही अशी भूमिका कामगार उपायुक्त टी. बी. चोळके यांनी घेतली आहे.

close