गृहमंत्र्यांनी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक

January 5, 2009 5:58 PM0 commentsViews: 1

5 जानेवारी, दिल्लीकेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी उद्या नवी दिल्लीत सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावलीय. दहशतवादाचा सामना करण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होईल. सर्व मुख्यमंत्र्याना बैठकीची कार्यक्रमपत्रिका देण्यात आलीय. यात ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि महाराष्ट्राला सागरी किनार्‍याच्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केल्याबद्दल खडसावलंय. मानवी आणि तांत्रिक गुप्तचर विभाग बळकट करण्यावरही त्यात भर देण्यात आला आहे.

close