सुप्रीम कोर्टाची ओरिसा सरकारला समज

January 5, 2009 6:04 PM0 commentsViews: 53

5 जानेवारी, दिल्लीकंधमालमधल्या जातीय दंगली चुकीच्या पद्धतीनं हाताळल्याबद्दल सुप्रीम कोर्टानं ओरिसा सरकारला चपराक दिली आहे. अल्पसंख्यांकांचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं कोर्टानं म्हटलंय. आणि सरकार जर हे करू शकत नसेल, तर सत्ता सोडावी, अशी स्पष्ट ताकीद दिलीय. केंद्र आणि राज्य सरकारनं या प्रकरणाचा मिळून विचार करावा, अशी सूचनाही कोर्टानं केलीय. आरती दरम्यान, या दंगलीवेळी बलात्कार झालेल्या नननं दोघा मारेकर्‍यांना ओळखलंय. यात या प्रकरणातल्या मुख्य आरोपीचाही समावेश आहे. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली होती.

close