सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

January 5, 2009 6:19 PM0 commentsViews: 2

5 जानोवारी, सिडनीसिडनी टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 327 रन्समध्ये संपुष्टात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 118 रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी मिळालीय. ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलने 59 रन्स देत पाच विकेट्स घेतल्या. पण त्यापूर्वी आज दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगला खिंडार पाडलं ते मिशेल जॉनसनने. त्याने कॅलिस आणि ड्युमिनीला आज पहिल्याच सेशनमध्ये आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेची अवस्था तेव्हा पाच विकेटवर 193 अशी झाली होती. पण त्यानंतर मार्क बाऊचर आणि मॉर्नी मॉर्केलने सातव्या विकेटसाठी सेंच्युरी पार्टनरशिप करत इनिंग सावरली. बाऊचरने शानदार 89 रन्स करत आफ्रिकेला 300 रन्सचा टप्पा ओलांडून दिला. पीटर सिडलने ही जोडी फोडली आणि मग बाऊचरला आऊट करत आफ्रिकेची इनिंगही संपवली. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग हेडन आणि कॅटिच यांनी सुरु केलीय. आणि तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे बिनबाद 31 झाले होते.

close