मुंबईत खंडणीबहाद्दरास अटक

January 5, 2009 3:22 PM0 commentsViews:

5 जानेवारी, मुंबईमुलुंडच्या एका मोठ्या रबर व्यापार्‍याचं 60 लाखांसाठी अपहरण करणार्‍याला पोलिसांनी अटक केलीय. उमेश ठक्कर असं अपहरण झालेल्या व्यापार्‍याचं नाव आहे. त्यांनी रमेश नायर यांना रबराच्या कच्च्या मालासाठी 60 लाख रुपये दिले होते. हेच पैसे परत देतो म्हणून नायर यांनी ठक्कर यांना केरळला नेलं. आणि मारहाण केली. एवढंच नाही तर त्यांच्याकडून जबरदस्तीनं 15-15 लाखांच्या 4 प्रॉमिसरी नोटही लिहून घेतल्या. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी रमेश नायरला अटक केली आहे.

close