कसाबच्या पोलीस कोठडीत वाढ

January 6, 2009 5:32 AM0 commentsViews: 5

6 जानेवारी, मुंबईमुंबई दहशतवादी हल्ल्यातला दहशतवादी,अजमल कसाबला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सीएसटी स्टेशन आणि कामा हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी,त्याला ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला कसाब हा एकमेव दहशतवादी आहे. आत्तापर्यंत त्याच्याकडून बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करण्यासाठी कसाब महत्त्वपूर्ण साक्षिदार आहे.हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांच्या खूनाचा कसाबवर आरोप आहे. याशिवाय देशविरोधी कट रचणे, निरपराध नागरिकांची हत्या असे 10 विविध आरोप कसाबवर ठेवण्यात आले आहेत. मोक्का अंतर्गत त्याच्यावर खटले चालवण्यात येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कोठडीतच त्याची सुनावणी करण्यात येत आहे. याआधीच्या सुनावणीत कसाबच्या कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली होती.

close