आर्थिक मागासांना आरक्षण द्या : शिवसेना

January 6, 2009 4:52 AM0 commentsViews: 2

6 जानेवारी, मुंबईमराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी 25 टक्के आरक्षण द्यावे, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.आपल्या सामना या मुखपत्रातून शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच मराठा आरक्षण देऊन समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, याचीही आठवण करून दिली आहे.सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शेतक-यांच्या आत्महत्या संपणार का ? त्यांची अन्नान्न दशा संपणार का ,आरक्षणाच्या ऊर्जेने महाराष्ट्रातील खेडी प्रकाशमान होणार काय, असेही प्रश्न सामनाच्या संपादकीयात उपस्थित करून ख-या प्रश्नांची आठवण करून दिली आहे.

close