ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

January 6, 2009 8:46 AM0 commentsViews: 3

6 जानेवारी सिडनीऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सिडनी इथं सुरू असलेल्या क्रिकेट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. त्यांच्याकडे 350पेक्षा जास्त रन्सची आघाडी आहे. आणि अजून 7विकेट बाकी आहेत. कालच्या बिनबाद 31 रन्सच्या स्कोअरवरून ऑस्ट्रेलियाने आपली दुसरी इनिंग पुढे सुरू केली. पण आक्रमक खेळणारा हेडन लवकर आऊट झाला. त्याने 39 रन्स केले. त्यानंतर मात्र कॅटिच आणि पाँटिंग यांनी भराभर रन्स वाढवत 72 रन्सची पार्टनरशिप केली. दोघांनी हाफ सेंच्युरी केली. अखेर स्टेनने कॅटिचला आऊट करत ही जोडी फोडली. पाठोपाठ पाँटिंगला मॉर्केलने बोल्ड केलं. पण त्यानंतर माईक हसी आणि मायकेल क्लार्क ही जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली .

close