डेबिट कार्डचाच वापर जास्त

January 6, 2009 9:11 AM0 commentsViews: 3

6 जानेवारी मुंबईशॉपिंग करताना किंवा इतर ठिकाणी सर्वात जास्त वापर क्रेडिट कार्डचा होत असेल असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्डचाच वापर जास्त केला गेला आहे. 2008 आणि 2009 या आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात डेबिट कार्डनं पैसे भरण्याचं प्रमाण 80 टक्क्यानं वाढलंय. सुमारे 84 टक्के ग्राहकांनी डेबिट कार्डनं बिल चुकतं केल्याचं आरबीआयच्या माहितीवरून समजतं. विशेषत: ऑक्टोबरच्या सणांच्या दिवसात डेबिट कार्डचा वापर 55 टक्क्यांनी वाढल्याचं या अहवालात म्हटलंय.

close