हर्षद मेहताच्या फ्लॅटसचे लिलाव

January 6, 2009 6:19 AM0 commentsViews: 3

6 जानेवारी मुंबई 1992 सालच्या शेअर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हर्षद मेहताचे फ्लॅटस विकायला काढण्यात आले आहेत. मुंबईच्या वरळी सी-फेस विभागात हे 8 फ्लॅट आहेत. शेअर घोटाळ्यातील पैसे वसूल करण्यासाठी हर्षद मेहताची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ती आता विकली जाणार आहे. लिलावातून येणा-या पैशातून बँका आणि वित्तीय संस्थांचे पैसे परत केले जातील. हर्षद मेहता याचे मुंबईतल्या वरळी भागात मधुली नावाच्या इमारतीत 8 फ्लॅट्स आहेत. मुंबई हायकोर्टातर्फे एक स्पेशल जज, कस्टोडियन म्हणून नेमण्यात आलेत. त्यांच्यातर्फे या फ्लॅटची बोली लावण्यात येईल. तिस-या मजल्यावरील 5 फ्लॅट्ससाठी प्रत्येकी 50 लाख रुपये बोली लावताना डिपॉझिटच्या स्वरूपात ठेवावी लागणार आहे. त्याशिवाय मधुली बिल्डिंगमधल्याच चौथ्या मजल्यावरील 3 फ्लॅटसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये बोली लावताना ठेवावी लागणार आहे. या 8 फ्लॅटसाठी कोणीही नागरिक, सरकारी वा खाजगी संस्था बोली लावू शकतील. हा लिलाव 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

close