राणेंसाठी दिल्लीत राजकारण

January 6, 2009 3:08 PM0 commentsViews: 3

6 जानेवारी नारायण राणे यांच्यावरून दिल्लीत जोरदार राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राणेंचं निलंबन रद्द होण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. नारायण राणे यांचं निलंबन रद्द करण्यासाठी माणिकराव ठाकरेही राजी झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या माणिकरावांनी सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. राणे यांनी कांग्रेसमध्ये राहणं पक्षाच्या फायद्याचं आहे असं माणिकराव यांनी सोनियांना सांगितलं. पण राणेंचं निलंबन रद्द होऊ नये अशी विलासरावांची इच्छा आहे, असं समजतंय. राणेंच्या जवळचे मानले जाणारे कन्हैयालाल गिडवाणी यांनीही सोनियांची भेट घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राणेंना सबुरीचा सल्ला दिला.पत्रकारांनी सल्ल्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले, मी राणेंना सांगितलं तुम्ही चांगले नेते आहेत. तुमचं काम उत्कृष्ट आहे. तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतील पण त्यासाठी तुम्ही संयम पाळला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.

close